नवी दिल्ली : ‘कोण जाणे दुखापत होती की, डावपेच? वेळ काढण्यासाठी वांगने तसे केलेही असेल’ अशी टिप्पणी भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटन पटू हिने गुरुवारी पराभवानंतर केली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सिंधूला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील वांग झी यि (चीन) हिच्याकडून ११-२१, २१-१५, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी आयुष शेट्टीही पराभूत झाल्यामुळे भारताची या स्पर्धेतील आशा आता दुहेरीतील कामगिरीवरच अवलंबून असेल.
'तिची दुखापत किंवा डावपेच... जे काही असतील; पण मी संयम राखायला हवा होता हेदेखील तितकेच खरे. खासकरून सामन्यातील अखेरच्या तीन गुणांच्यावेळी. एकूणच आता विश्लेषण करायचे झाले तर या सामन्यातील माझ्याकडून चुका जवळपास झालेल्याच नाहीत. लढत खूपच छान झाली. यापुढे संयम वाढवण्यावर अधिक मेहनत घेईन', असे सांगत सिंधूने आपली चूकही मान्य केली. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सिंधूच्या पालकांचा उत्साह अन् चाहत्यांनी तिचा उत्साह वाढवण्याची एकही संधी सोडली नाही. आपल्या या लाडक्या खेळाडूचा पराभव त्यांच्याही जिव्हारी लागला असावा; म्हणूनच की काय सिंधूने अखेरचा गुण गमावला अन् प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने काढता पाय घेतला.'दुखापत खरीच आहे...'
'सिंधूची नाराजी मी समजू शकते. खेळात अशा दुखापतींना डावपेच म्हणून वापरतात. मात्र माझ्या मांड्यांमध्ये खरोखरच गोळे आले होते. आधी डाव्या आणि मग उजव्या पायातून प्रचंड वेदना झाल्या', असे वांग हिने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंद स्मित करत सांगितले. 'खरं सांगते... मी कोसळले तेव्हाही, मनात दोनच प्रश्न होते : एक- यातून लवकरात लवकर बरी कशी होऊ शकेन? आणि दुसरा- बाजी माझ्या बाजूने कशी वळवता येईल?', असेही वांग म्हणाली.
अकरा वर्षांनंतर...
जागतिक स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताची अकरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी जपानच्या आठव्या मानांकित रिन इवानागा-काय नकानिशी यांचा (जपान) ४४ मिनिटांत २१-१६, २१-१२ असा पराभव केला. २०१५मध्ये ज्वाला गुत्ता आणि अश्विनी पोनप्पा यांनी जागतिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. दुहेरीतील खेळाडू नेट जवळील खेळ आणि बॅक कोर्ट अशी जबाबदारी आपापसात वाटून घेतात. मात्र त्रिसा आणि गायत्री यांनी दोन्ही आघाड्यांवर मिळून योगदान दिले, हा बदल जाणीवपूर्वक केल्याचे गायत्रीने सांगितले. ही शैली पुरुष दुहेरीतील भारताची अव्वल जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अवलंबली आहे.
१ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनमध्ये सिंधू प्रथमच चिनी प्रतिस्पर्धीविरुद्ध गारद.
जगज्जेत्या शि युकी याला नमवून स्पर्धेची दणक्यात सुरुवात करणारा भारताचा २१ वर्षीय शिलेदार आयुष शेट्टी याचे आव्हानही उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्याला इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याच्याकडून १९-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावरील फरहानविरुद्धच्या आठपैकी पाच लढती आयुषने गमावल्या आहेत. यासह स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील यजमान भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.