New Educational Transformation With Rays Of Education School In Haveli Taluka
हवेलीत उभारणार ‘रयतेची शाळा’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : शिरूरपाठोपाठ खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील दत्तात्रय वारे गुरुजींनी शाळांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध केल्या. त्या धर्तीवर आता हवेली तालुक्यातील ३६ गावांतील शाळांमध्ये शैक्षणिक दृष्ट्या परिवर्तन घडविण्यासाठी रयतेची शाळा उभारण्यात येणार आहे.
हवेली पंचायत समितीच्या उपसभापती विद्या गायकवाड यांनी ‘रयतेची शाळा’ संकल्पना मांडली. त्यांच्या पुढाकाराने आणि वारे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून उपक्रम राबविला जाणार आहे. उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून समाविष्ट ३६ गावांतील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. लोकसहभागातून शाळेचा कायापालट कशा पद्धतीने करता येईल यासाठी वाबळेवाडी, गरदडेवाडी, जालिंदरनगर, बालेघर या शाळेतील सादरीकरण करण्यात आले. युवराज काकडे, युवराज वांजळे, शुभांगी खिरीड, मोनिका कंद, सुषमा मुरकुटे, राणी वाळके, कोमल कांबळे, गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे उपस्थित होते.