भाजप घाबरलेला पक्ष

Contributed byपुणे|महाराष्ट्र टाइम्स
bjps fortune is dwindling sanjay raut
‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वतःच्या पक्षाच्या दोन नगरसेवकांचा पुणे महापालिकेत निधी थांबवला असेल, तर त्यांनी बोलले पाहिजे, तुम्ही किती काळ भाजपची पालखी वाहणार,’ असे राऊत यांनी मत व्यक्त केले.

‘ भाजप हा घाबरलेला पक्ष आहे, त्यांनी कधीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी शौर्य गाजवले नाहीत. अशी इतिहासामध्ये उदाहरणे नाहीत. त्यांनी मागील काही दिवसांत ऑपरेशन सिंदुर थांबवले, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू शकत नाही, आता त्यांचा शेवटचा काळ आहे. २०२९च्या अगोदर ही पडझड होऊ शकते,’ अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी हडपसर येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. या वेळी महापालिकेतील गटनेते नितीन गावडे, उल्हास शेवाळे आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यासाठी पोलिसांनी लावलेल्या विविध अटींवर राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. इतर नेत्यांच्या कार्यक्रमांनाही अशाच प्रकारच्या अटी लावल्या जातात का, असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत, असे सांगतानाच वंदे मातरमच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी भाजपवर टीका केली. ‘वंदे मातरमला कोणीही विरोध केलेला नाही. स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नसलेल्यांनी आता वंदे मातरमचा मुद्दा करू नये,’ असे ते म्हणाले.