लग्न जुळवण्यासाठीअघोरी पूजा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
लग्न जुळवण्यासाठीअघोरी पूजा!
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून आणि अघोरी पूजा करून अडचणी दूर करण्याचे भासवून एका ३४ वर्षीय महिलेची भोंदूबाबाने ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जुने नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमीत उघड झाला आहे. या प्रकरणी भोंदूबाबासह महिलेच्या नातेवाइकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त...२
‘बॉस’ कारागृहातच!

नाशिक : सातपूर हद्दीतील गोळीबार प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या ‘पीएल ग्रुप’ अर्थात लोंढे टोळीचा म्होरक्या प्रकाश उर्फ ‘बॉस’ आणि त्याचा मुलगा दीपक उर्फ ‘नाना’ लोंढे यांचा ‘मोक्का’अंतर्गत जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. प्रकाशने टोळीच्या सदस्यांना सोन्याच्या चक्क ३२ अंगठ्या वाटल्या असून, दीपकने खंडणीचा पैसा ‘व्हाइट’ करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.

सविस्तर वृत्त...२

‘जेन-झी’ची भीती

नाशिक : राज्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच आदिवासी आश्रमशाळांमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे ‘जेन-झी’च्या प्रश्नांसाठी आपण ३१ ऑगस्टपासून राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली. भाजप सरकारला ‘जेन-झी’ची भीती वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली.सविस्तर वृत्त...३