बेकायदा मद्यविक्री; ढाबामालक अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
illegal liquor sales in pune dhaba owner arrested
पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत ढाब्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदा मद्यविक्रीवर बाणेर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६१ हजार २२० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, ढाब्याचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली.

ढाबामालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९, रा. सिल्व्हर क्राउन अपार्टमेंट, कृष्णा चौक, पिंपळे गुरव) आणि व्यवस्थापक गोपाळ श्रीकृष्ण निचळ (वय ४५, रा. रुद्र सोसायटी, पौड रस्ता, भुगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई-बेंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत सुर्वेज ढाब्यामध्ये बेकायदा मद्यविक्री सुरू असल्याची माहिती गस्तीवर असलेले सहायक निरीक्षक बाळाजी सानप यांना मिळाली. त्याची खातरजमा करून वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी कारवाईचे आदेश दिले.