The Impact Of Vande Mataram In The Freedom Struggle And Minister Mohols Statement
‘वंदे मातरम्’ने विद्यापीठ निनादले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(पान १ वरून)
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून समोर आलेल्या या गीताने स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणागीताची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या अखेरीस परिसरातील दिवे मंद करण्यात आले. मोबाइलचे फ्लॅशलाइट एकाच वेळी उजळले आणि युवकांनी ‘ वंदे मातरम् ’चे सामूहिक गायन केले. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, दुष्यंत मोहोळ, सागर वैद्य सहभागी झाले होते.‘काँग्रेसमधील काही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्याला विरोध केला. त्यांनी देशाची, क्रांतिकारकांची आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या थोर व्यक्तींची माफी मागितली पाहिजे. राष्ट्रभक्त युवक संपूर्ण वंदे मातरम् म्हटल्याशिवाय आणि काँग्रेसच्या लोकांना म्हणायला लावल्याशिवाय राहणार नाहीत. संपूर्ण वंदे मातरम् म्हणून आपण राष्ट्रभक्ती दाखवून देऊ,’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.