Approval For 100 Crore Turnkey Casualty Project For Medical College In The State
शंभर कोटी रुपयांच्या ‘टर्न की कॅज्युॲल्टी’ला मान्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राज्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयासाठी शंभर कोटी रुपयांची ‘टर्न की कॅज्युॲल्टी’ प्रस्तावित करण्यात आली होती. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी इतक्या महागड्या आणि अव्यवहार्य प्रकल्पाची गरज नाही, असे सांगितल्याने डीएमआरने हा प्रकल्प संमत न करण्याचा निर्णय घेतला. मात्र आयुक्तांनी विदेशी जाताना विमान प्रवासामध्ये या ‘टर्न की’ प्रकल्पांवर स्वाक्षरी करून या अभिनव कॅज्युॲल्टीला मान्यता दिली.