27 Killed In Russian Attack In Bucha District Of Ukraine
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये २७ ठार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कीव्ह : रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हजवळील बुचा जिल्ह्यावर केलेल्या हल्ल्यात किमान २७ जण ठार झाले. या हल्ल्यात किमान ५० निवासी इमारतींचे नुकसान झाले असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘मायला गावातील गोदामावर हल्ला झाला आणि त्यानंतर स्फोट झाला,’ अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेल्येन्स्की यांनी दिली. ‘नियमानुसार दारूगोळ्याचा साठा घरांजवळ किंवा इतर निवासी भागांजवळ करता येत नाही. अधिकृत हलगर्जीच्या आरोपांखाली फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. देखभाल केंद्र आणि निवासी इमारतींचे नुकसान झाले. ३७० हून अधिक लोकांना आधीच स्थलांतरित करण्यात आल्याचे असे झेल्येन्स्की म्हणाले.