The Strength Bjp Gained Due To Eknath Khadses Contribution
‘भाजप उभारणीत खडसेंचे योगदान मोठे’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथील कोथळी निवासस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, ‘महाराष्ट्रात भाजप पक्ष उभा राहण्यात आणि समाज उभारणीत एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे,’ अशा भावना व्यक्त केल्या.