बचावकार्य युद्धपातळीवर

Contributed byकाठमांडू|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बचावकार्य युद्धपातळीवर
नेपाळमध्ये आकस्मिक पुरातील मृतांचा आकडा शनिवारी ६६९वर पोहोचला. बचाव पथके अजूनही शोध आणि मदतकार्यात गुंतली आहेत. आतापर्यंत सुमारे २,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे; मात्र २,४००हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.

नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमस्खलनामुळे पाणी, चिखल आणि मलब्याचा मोठा लोंढा मध्य नेपाळमधील गावांमध्ये शिरला. या पुरात घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले. भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आणखी पुराचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटच्या विभागानुसार, चीनच्या बाजूला सात जणांचा मृत्यू झाला. शोध आणि बचावकार्यासाठी ११ हजारहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पाच हजारहून अधिक नेपाळी लष्कराचे जवान आहेत.
भारताचे ११ सदस्यीय बचाव पथक शनिवारी नेपाळमध्ये दाखल झाले. या पथकात वैद्यकीय कर्मचारी आणि बोगदा बचाव तज्ज्ञांचा समावेश आहे. नेपाळ सरकारच्या विनंतीवरून हे पथक पाठवण्यात आले. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी नेपाळने भारत आणि चीनकडे ४२ बेली पूल उभारण्यासाठी मदत मागितली आहे.