‘पडताळणी समित्या बरखास्त करा’

Contributed byमराठा आरक्षण नेते|महाराष्ट्र टाइम्स
‘पडताळणी समित्या बरखास्त करा’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या तातडीने बरखास्त करण्यात याव्यात,’ अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ‘सरकारने १२ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास मराठा समाज मुंबईत येईल,’ असा इशारा त्यांनी दिला. ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे पडताळणीसह द्यावीत, यासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत शनिवारपासून जरांगे यांचे उपोषण सुरू झाले.

जरांगे पाटील यांचे गेल्या तीन वर्षांतील हे ११ वे उपोषण आहे. ‘आपले सध्याचे उपोषण शेवटचे आणि निर्णायक आंदोलन आहे; आता सरकारने ठोस निर्णय घ्यावा,’ अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली.
मराठा आंदोलकांनी शनिवारी शक्तिप्रदर्शन करून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री फाटा येथे रास्ता रोको केले. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या.