व्हेनेझुएलाच्या तेलावरअमेरिकेचे नियंत्रण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
व्हेनेझुएलाच्या तेलावरअमेरिकेचे नियंत्रण
वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलासोबत एक व्यापक करार केला आहे. तो अमलात आल्यानंतर अमेरिकेला या दक्षिण अमेरिकी देशातील अद्याप न वापरलेल्या सुमारे ६५ अब्ज बॅरल तेलसाठा अगदी वाजवी दरात उपलब्ध होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

सविस्तर वृत्त...८
जरांगेंचे उपोषण सुरू

जालना : जालना जातप्रमाणपत्र पडताळणी समित्या तातडीने बरखास्त करण्यात याव्यात, अशी मागणी मनोज पाटील जरांगे यांनी केली आहे. सरकारने १२ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास मराठा समाज मुंबईत येईल, असा इशारा त्यांनी दिला. ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे पडताळणीसह द्यावीत, यासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत शनिवारपासून जरांगे यांचे उपोषण सुरू झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वृत्त...६

‘कृष्णभावनेने शांतता’

न्यूयॉर्क : आज जगात अनेक संघर्ष आहेत, अनेक अंतर्विरोध आहेत; परंतु या सर्वांना एकत्र आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चेतना. ती चेतना म्हणजे कृष्णभावना. आपण एक आहोत आणि या जगातील द्वैतांमधून आपण ही जाणीव टिकवून ठेवली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.

सविस्तर वृत्त...८

जाधव यांचा सन्मान

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील दादासाहेब फाळके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प निदेशक अर्चना मोरे-जाधव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शिक्षकदिनी, पाच सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

सविस्तर वृत्त...५

रेल्वेत विषबाधा

जळगाव : भुसावळमार्गे धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून केरळकडे प्रवास करणाऱ्या सुमारे ८३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३५ विद्यार्थ्यांना विषबाधासदृश त्रास झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. इटारसी स्थानक सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्यांचा त्रास जाणवू लागला. भुसावळ रेल्वे विभागाच्या नियंत्रण कक्षाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून देत या विद्यार्थ्यांवर उपचार केले.

सविस्तर वृत्त...७