शाळेच्या वाटेवर काळाचा घाला

Contributed byमालेगाव|महाराष्ट्र टाइम्स
शाळेच्या वाटेवर काळाचा घाला
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
कुसुंबा-मालेगाव महामार्गावर लेंडाणे गावाजवळ शनिवारी सकाळी नऊ वाजता भरधाव कारच्या धडकेत आरोही बालाजी चव्हाण (वय १२) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. शाळेच्या वाटेवर निघालेल्या आरोहीला कुसुंब्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या कारने (एमएच ०६/बी ००५५) जोरदार धडक दिली.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी कार अडवली. गंभीर जखमी आरोहीला त्याच कारमधून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत संताप व्यक्त केला. संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या देत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहूड घाटात शुक्रवारी ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने लक्झरी बस, पोलिस व्हॅन, कारसह पाच वाहनांना धडक दिली. यात कंटेनरमधील हेल्परचा मृत्यू झाला, तर सात-आठ जण जखमी झाले. सविस्तर वृत्त...२