Arrest Of Two In Bike Fire Incident In Kalyan East
रस्त्याच्या कडेच्या दुचाकी जाळल्या
महाराष्ट्र टाइम्स•
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या १० ते १२ गाड्यांची तोडफोड करत दुचाकी जाळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरू केला आहे.
खडेगोळवली परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातवरण पसरले. बाजूला असलेल्या एका बैठ्या घराचे पत्रेही या आगीत जळाले. मात्र स्थानिकांनी पाहणी केली असता चारचाकींची तोडफोड केल्याचे आढळून आले. यानंतर दोन तरुणांनीही तोडफोड करत गाड्या जाळल्याचे आढळताच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांना अटक केली.