Navys Capability enhancing Nipun Warship To Be Inducted On August 31
नौदलाची ताकद वाढवणार ‘निपुण’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
समुद्राच्या तळाशी सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या मोहिमांमध्ये नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. पाण्याखाली मदतकार्य, बचाव तसेच खोल समुद्रातील मोहिमांसाठी सज्ज असलेली ‘ निपुण ’ ही स्वदेशी युद्धनौका ३१ ऑगस्टला मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. निस्तार श्रेणीतील पाण्याखाली मदतकार्य करणारी ही दुसरी युद्धनौका असून, तिच्या समावेशामुळे नौदलाची खोल समुद्रातील कामगिरी आणि पाण्याखालील मदतकार्याची क्षमता अधिक भक्कम होणार आहे.
विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने ‘निपुण’ची रचना करून तिची निर्मिती केली आहे. आधुनिक तांत्रिक यंत्रणा आणि विविध सुविधांनी सज्ज असलेल्या या नौकेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ३० जुलैला ते नौदलाकडे सोपवण्यात आली होती. आता ३१ ऑगस्टला औपचारिकरीत्या तिचा नौदलाच्या ताफ्यात समावेश केला जाणार आहे.