न्यायालयाच्यानिकालावर नाराजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
owaisis discontent over hijab verdict attack on muslim community
हैदराबाद : ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी हिजाबवरील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आणि यास ‘इस्लामवरील हल्ला’ असे संबोधले.

मिलाद-उन-नबीनिमित्त येथील ‘एमआयएम’चे मुख्यालय दारुस्सलाम येथे सभेत ओवैसी बोलत होते. ‘अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या एका मुलीला शाळेत हिजाब घालता येणार नाही असा निकाल दिला. या निकालाशी मी असहमत आहे. हे घटनेच्या कलम २५ आणि १९ चे हे उल्लंघन आहे’ असे ते म्हणाले.