Pensioners To Receive Special Gift On Onam Festival
ओणमनिमित्त पेन्शनची भेट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओने ओणम सणादरम्यान बुधवारी केरळम विभागातील ४,४०,९०१ पेन्शनधारकांना ऑगस्ट महिन्याचे पेन्शन जमा केले.
सर्वसाधारणपणे, कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (ईपीएस), १९९५, मासिक पेन्शन महिन्याच्या अखेरीस दिले जाते, असे कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, ओणम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ईपीएफओने पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता याव्यात आणि कोणत्याही गैरसोयीविना सण साजरा करता यावा यासाठी २६ ऑगस्ट २०२६ रोजी पेन्शन जारी करण्यासाठी विशेष व्यवस्था केली.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने ( ईपीएफओ ) या निवेदनात ईपीएफओ आपल्या सर्व सदस्यांना आणि पेन्शनधारकांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा देत असल्याचेही त्यात नमूद केले. ईपीएफओच्या केंद्रीकृत पेन्शन देयक प्रणालीद्वारे (सीपीपीएस) पेन्शन जमा करण्यात आले आहे. ईपीएफओ सामाजिक सुरक्षा लाभांचे वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असून, तंत्रज्ञान-सक्षम उपक्रम आणि नागरिक-केंद्रित सुधारणांच्या माध्यमातून पेन्शन सेवांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.