Rahul Gandhis Strong Criticism Of Bihar Government
बिहारवर राहुल गांधींची टीका
Contributed by: विरोधी पक्षनेते|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बिहारमध्ये आंदोलक विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीची गंभीर दखल घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘विद्यार्थ्यांची जबाबदारी झटकण्यासाठी सरकार पोलिसांना शस्त्र बनवत आहे’, अशी टीका राहुल यांनी केली आहे.
पाटण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीत राहणाऱ्या आदित्य नामक सहावर्षीय मुलाने धारदार वक्तव्य केल्याची चित्रफीत बुधवारी समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाली. या मुलाला अटक झाल्याची अफवाही पसरली. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर बिहार सरकारवर टीका करणारी पोस्ट लिहिली. ‘बिहारमधील विद्यार्थ्यांनी पेपरफुटीप्रकरणी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे. बिहारमधील तरुणांबाबत हा भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार किती दिवस चालणार आहे. बिहार लोकसेवा आयोगाचा वादग्रस्तपणा नवा नाही. विविध मुद्यांवर सरकारने काहीच कारवाई का नाही केली’, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल यांनी केली.