गृहनिर्माण वित्त क्षेत्रात भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) अव्वल स्थान अधोरेखित करत, मजबूत मागणीच्या जोरावर तारण पोर्टफोलिओ चालू तिमाहीत १० लाख कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणार आहे, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष सीएस सेट्टी यांनी व्यक्त केला आहे. देशातील सर्वांत मोठ्या कर्जदात्याने गेल्या आर्थिक वर्षात ९ लाख कोटी रुपयांचा गृहकर्ज पोर्टफोलिओ ओलांडला होता. एसबीआयचा गृहकर्ज क्षेत्रात जवळपास २८ टक्के बाजारहिस्सा आहे, असे ते म्हणाले, आणि बँकेने संपूर्ण देशात गृहकर्ज सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे असेही ते म्हणाले.