लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात खालापूर टोल नाक्याजवळील फूड मॉलजवळ लोखंडी कॉइलची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरची पुढे जाणाऱ्या एका ट्रकला मागून जोरात धडक बसली. या विचित्र अपघातामुळे ट्रेलर मार्गावर उलटून लोखंडी कॉइल्स रस्त्यावर पडल्या. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
डांबर प्लान्ट बंद करायेरवडा : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील डांबर हॉट मिक्स प्लान्टमुळे हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापौर जागेवर येऊन पाहणी करून निर्णय घेत नाही, तोपर्यंत डांबर प्लान्ट सुरू होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी घेतली आहे.
चार्जिंग करताना मृत्यू
नागपूर : ई-रिक्षा चार्जिंग करताना विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुलशननगर परिसरात घडली. हेमचंद बाबूलाल आमाडार (वय ३३) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास हेमचंद हा ई-रिक्षा चार्जिंग करीत होता. यादरम्यान त्याने प्लगचा वायर तपासला त्याला विजेचा धक्का बसला व बेशुद्ध झाला. याचदरम्यान त्याची आई तेथे आली. आईलही विजेचा धक्का बसला. बेशुद्ध हेमचंद याला नातेवाइकांनी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मुलीवर बलात्कार
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून युवकाने सोळावर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी युवकाविरूद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आसिम आरिफ अन्सारी (वय १९) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.