Dr P R Kinare Senior Worker Of Rashtriya Swayamsevak Sangh
डॉ. पां. रा. किनरे यांचे निधन
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि कामगार चळवळीतील कार्यकर्ते डॉ. पांडुरंग राजाराम किनरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना आणि सहा नातवंडे असा परिवार आहे.
पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. परळ, लालबाग आणि वरळी परिसरात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांनी लिहिलेले ‘तृप्तीची तीर्थोदके’ हे पुस्तक विशेष उल्लेखनीय ठरले.