Passengers Problems At Railway Station Dont Wait For The End Rickshaw Unions Misconduct
‘अंत पाहू नये’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दिवसभर कोंडीत भर घालत रेल्वे स्टेशनला गराडा घालणाऱ्या रिक्षा सायंकाळी प्रवाशांच्या गरजेच्या वेळी मात्र सोयीस्करपणे गायब होत असल्याने या रिक्षाचालकांना वेळ आणि स्टँड ठरवून दिले जावेत, अशी मागणी आता प्रवाशांनी रिक्षा संघटनांकडे केली आहे. मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या या संघटना प्रवाशांना सेवा देण्यापेक्षा त्यांची जास्तीत जास्त परवड करण्यावरच भर देत असल्याने, प्रवाशांच्या सहनशीलतेचा रिक्षाचालकांनी अंत पाहू नये, असा इशाराच प्रवाशांनी दिला आहे.