अनधिकृत आठवडा बाजारांवर कारवाई

महाराष्ट्र टाइम्स
strict action by cidco against unauthorized weekly markets
उलवे नोडमधील सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर भरणाऱ्या अनधिकृत आठवडा बाजारांविरोधात सिडको आणि उलवे पोलिसांनी संयुक्त धडक मोहीम सुरू केली आहे. २४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या कारवाईत सेक्टर २, ५, १९, २० आणि २१ परिसरातील रस्ते व पदपथांवरील अनधिकृत विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले.

या मोहिमेदरम्यान सार्वजनिक रस्ते व पदपथांवरील अनधिकृत हातगाड्या, विक्रेत्यांचे साहित्य, तसेच वाहतुकीस आणि नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा ठरणारे साहित्य हटविण्यात आले. त्यामुळे संबंधित परिसरातील रस्ते आणि पदपथ मोकळे झाले आहेत.
मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशान्वये, मुख्य नियंत्रक विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रक अमित राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सिडकोचे अधिकाऱ्यांचा सहभाग होता.