‘मार्जिनल स्पेस’वरील अतिक्रमणांविरोधात उपोषण

महाराष्ट्र टाइम्स
marginal space protests against encroachments announced
वाशी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील कथित भ्रष्टाचाराला आळा घालावा, तसेच मार्जिनल स्पेसवरील अनधिकृत वापर हटवावा, या मागण्यांसाठी कामगार नेते प्रदीप वाघमारे सोमवार, ३१ ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत. वाशी विभाग कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाशी सेक्टर ९, १०, १५ आणि १७ परिसरातील काही व्यापाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून मार्जिनल स्पेसचा अनधिकृत वापर केला जात असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. काही व्यावसायिकांनी दुकानांसमोरील जागा ताब्यात घेऊन दुकानांचा विस्तार केला असून, काहींनी ही जागा इतर व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच कारवाई करताना सर्वांसाठी समान निकष का लावले जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
मार्जिनल स्पेस मोकळ्या करून घेण्याच्या मागणीसाठी वाघमारे यांनी महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना वारंवार निवेदने दिली आहेत.