Chandansaz Poetry Collection Published In The Presence Of Mrunal Kulkarni
‘चांदणसाज’ कवितासंग्रह प्रकाशित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : मिहाना पब्लिकेशन्सतर्फे मंजिरी शहाणे लिखित ‘चांदणसाज’ या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष, गझलकार प्रदीप निफाडकर, गायक श्रीकांत पारंगावकर, ‘मिहाना प्रकाशना’च्या अमृता कुलकर्णी आणि कवयित्री मंजिरी शहाणे उपस्थित होते. स्वरा बांदिवडेकर यांनी गणेशवंदना सादर केली. ‘मिहाना पब्लिकेशन्स’च्या संपादक डॉ. अंजली जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिरुद्ध रांजेकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘समाजवाद हा ‘जेन झी’चा वैचारिक पाया’पुणे : ‘जेन झी पिढी जबाबदारीने पुढे येऊन लोकशाही समाजवादाची भाषा बोलत आहे. लोकशाही समाजवाद हा त्यांच्या आंदोलनाचा वैचारिक पाया आहे,’ असे मत आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी स्थापन करण्यात ‘गांधी-नेहरू विचार मंचा’तर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अनिल कुबल, उपाध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे आणि खजिनदार ॲड. शशिकांत सावरकर उपस्थित होते.
‘आसमंत’कडून दुपारच्या रागांची मैफल
पुणे : दुपारच्या रागांचा आनंद घेता यावा, यासाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनने दुपारच्या रागांची मैफल आयोजित केली होती. गायक ओंकारनाथ हवालदार यांनी दुपारी गायल्या जाणाऱ्या ‘सारंग’ रागाचे विविध प्रकार सादर केले. या कार्यक्रमासाठी युवा गायक मेहेर परळीकर यांनी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा तानपुरा उपलब्ध करून दिला होता. रामदास पळसुले (तबला), समीर हवालदार (हार्मोनियम), समीर कुलकर्णी आणि वेद मुळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. नंदकुमार पटवर्धन, नितीन करमरकर व पुरुषोत्तम पेंडसे उपस्थित होते. दुहिता खेर यांनी सूत्रसंचालन केले.