टीम इंडियाची जिद्द,मानसिकतेचे कौतुक

Contributed byभारतीय संघाचे प्रशिक्षक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
टीम इंडियाची जिद्द,मानसिकतेचे कौतुक
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय हुकल्याने टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे; मात्र या प्रतिकूल परिस्थितीत संघाचे मुख्य़ प्रशिक्षक गौतम गंभीर संघाच्या मागे खंबीर उभे ठाकले आहेत. यशासाठी अखेरपर्यंत संघर्ष करणाऱ्या भारतीय संघाने जिद्द आणि मानसिक कणखरता दाखवून दिली, असे गंभीर यांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावरून शुक्रवारी आपले मनोगत व्यक्त करताना गंभीर यांनी श्रीलंकेचा पराभव टाळणारा युवा फलंदाज सोनल दिनुशा याचीही प्रशंसा केली.
भारताने गॉल येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर १६५ धावांनी मात करून मालिकेत आघाडी घेतली होती. कोलंबोमध्ये दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी श्रीलंकेने जबरदस्त पलटवार करून भारताला विजयापासून रोखले. या संघर्षात दिनुशाने महत्त्वाची भूमिका बजावली. यासोबतच भारताने दोन सामन्यांची मालिका १-०ने आपल्या नावावर केली.

दिनुशाने गुरुवारी दुसऱ्या डावातही शतक झळकावून भारताच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरले आणि कसोटी अनिर्णित राखण्यात महत्त्वाचे योगदान दिले. यापूर्वी, भारताने श्रीलंकेला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले होते. दिनुशाने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १०३ धावा केल्या होत्या. भारताने पहिला डाव नऊ बाद ५०३ धावांवर डाव घोषित केला होता; मात्र श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांवर आटोपल्याने त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आली; मात्र सोनल दिनुशा याने दुसऱ्या डावातही (नाबाद १३३) शतकी खेळी करत भारताला विजयापासून दूर ठेवले.

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या अलीकडील कसोटी मालिकेत ऋषभ पंतची फटक्यांची निवड आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर माजी कसोटीतज्ज्ञ फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘स्फोटक शैलीत फलंदाजी करणारा हा यष्टिरक्षक-फलंदाज आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही,’ असे अश्विनचे म्हणणे आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने मुख्य यष्टिरक्षक म्हणून पंतवर विश्वास टाकला होता. पंतने मालिकेत १६८ धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. ‘पन्नासपेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या पंतकडून आता अधिक जबाबदारी आणि चांगले निर्णय घेण्याची अपेक्षा आहे,’ असे अश्विनने यूट्यूबवरील कार्यक्रमातील विश्लेषणात सांगितले. ‘श्रीलंकेच्या सोनल दिनुशा याचा स्ट्राइक रेटही बराच चांगला होता; पण खरा फरक त्याचा दृष्टिकोन आणि फटक्यांच्या निवडीत दिसला. पंतचे फटके जोखमीचे असतात. सामन्यातील परिस्थिती आणि संघाची गरज ओळखून कामगिरी करणे आवश्यक आहे,’ असे अश्विन म्हणाला.