नीरज नांदेडेने पटकावले विजेतेपद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
neeraj nandedekar makes history in table tennis
पुणे : नीरज नांदेडेने मोसमातील चौथ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.

प्रभात रस्त्यावरील सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. १५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत बिगरमानांकित नीरज नांदेडेने अव्वल मानांकित आर्यन वानखेडेला ११-६, ११-७, ९-११, ११-९ असा धक्का दिला.