डायमंड लीगसाठीनीरजची पात्रता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
डायमंड लीगसाठीनीरजची पात्रता
ल्यूसान : नीरज चोप्रा डायमंड लीग ॲथलेटिक्स मालिकेतील अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस पात्र ठरला आहे. ही स्पर्धा ४ आणि ५ सप्टेंबरला ब्रसेल्स येथे होईल. या पात्रतेद्वारे नीरज भालाफेकीत सातत्याने चांगली कामगिरी करीत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेला नीरज या वेळी डायमंड मालिकेतील दोनच स्पर्धेत खेळला. तो दोहा स्पर्धेत ८५.६९ मीटर कामगिरीसह चौथा आला होता. त्यानंतर त्याने ल्यूसान स्पर्धेत ८८.०५ मीटर कामगिरी करीत दुसरा क्रमांक मिळवला होता. तो झ्युरीक स्पर्धेत खेळला नव्हता; मात्र दोन स्पर्धांतील कामगिरीमुळे त्याने अंतिम स्पर्धेची पात्रता मिळवली.