हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्याला अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
couple arrested by delhi police for espionage for isi
पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मोहम्मद साहिल (२५) आणि समीरा (२१) असे या दाम्पत्याचे नाव आहे. २०२४ पासून हे दाम्पत्य आयएसआयसाठी काम करत असल्याचा आरोप आहे.

साहिल आणि समीरा यांनी भारतीय सिमकार्डे मिळवून ती दुबईमार्गे पाकिस्तानमध्ये पाठवली. त्याबदल्यात त्यांना प्रतिसिमकार्ड सुमारे ३० हजार रुपये मिळाले होते. या दोघांनी २०२४ आणि २०२५ दरम्यान हेरगिरी केल्याचे उघड झाले.