शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येमुदतवाढीवरून नाराजी

महाराष्ट्र टाइम्स
discontent among shiv sena ministers over tenure extension
शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांच्या कारभारात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून हस्तक्षेप होत असल्याच्या दबक्या आवाजातील चर्चेला शुक्रवारी जाहीर नाराजीचे स्वरुप मिळाल्याचे समजते. शिवसेनेकडे परिवहन विभाग असताना रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट एका वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उघड नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या महत्त्वाच्या विभागांमधील धोरणात्मक निर्णय असोत किंवा प्रशासकीय बदल्या, अनेक गोष्टींवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट नियंत्रण ठेवले जात असल्याचा आरोप अधून-मधून दबक्या आवाजात शिवसेनेच्या मंत्र्याकडून (पान ९वर)