England Takes A Lead Of 180 Runs Against Pakistan In The Second Test
पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडला आघाडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
लंडन : ऑली रॉबिन्सन आणि जोफ्रा आर्चर यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडने मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव ११० धावांत गुंडाळला आणि १८० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, दुसऱ्या डावात इंग्लंडने २० षटकांत ३ बाद ७१ धावा केल्या होत्या. ‘लॉर्ड्स’वर ही लढत सुरू आहे.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड : पहिला डाव - सर्व बाद २९० (जॉर्डन कॉक्स ५५, जेमी स्मिथ ६१, गस ॲटकिन्सन ४५, जोश टंक नाबाद ३०, महंमद अब्बास ४-७३, महंमद अली ३-८६) आणि दुसरा डाव - ३ बाद १७१ (हॅरी ब्रूक खेळत आहे ६, एमिलिओ खेळत आहे २६) वि. पाकिस्तान : पहिला डाव - सर्व बाद ११० (आझान आवेस ४६, सौद शकील १६, ऑली रॉबिन्सन ४-११, आर्चर ३-२६, जोश २-२७).