समानता: खरीखुरी की सोयीनुसार?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
equality is it truly necessary the article emphasizes the importance of change
(पान ५ वरून)

‘यांनी मस्त मजा करायची नवऱ्याबरोबर, मग सहा सहा महिने आराम करायचा आणि आम्ही यांची कामं उपसायची’ हे दु:ख शंभर टक्के पुरुष सहकाऱ्यांचं असतं. ही पुरुषसत्ताक मानसिकता कायदे करून, कागदावर समान हक्क देऊन बदलत नाही.
काही मोठ्या, संवेदनशील व्यवस्थापन असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्त्रियांना सोयीच्या वेळेत काम करण्याची आता सुविधा आहे. कोव्हिडच्या लाटेपासून घरून काम करण्याची सुविधाही काही ठिकाणी आहे. अनेक मोठ्या सरकारी उपक्रमांमध्ये आज पाळणाघरं आहेत. जागरूकता वाढल्यामुळे स्वछतागृहांची परिस्थिती सुधारली आहे. वाढत्या वयातल्या तब्येतीच्या तक्रारी लक्षात घेऊन निदान नोकरीच्या शेवटच्या दिवसांत स्त्रियांना घराजवळचं कामाचं ठिकाण अनेकदा दिलं जातं. मोबाइलच्या उपलब्धतेमुळे घरच्यांच्या संपर्कात राहणं आता शक्य आहे. असे काही बदल जरूर दिसतात, पण कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या जेमतेम एक-दोन टक्के स्त्रियांच्या वाट्याला ते येतात. समाजातील सर्व थरांतील पालकांच्या आपल्या मुलींना शिकवण्याच्या ऊर्मी वाढत असताना शिक्षणामुळे येणारा स्वाभिमान, हक्कांची जाणीव आणि त्यासाठी लढण्याची तयारी मात्र अजून दिसत नाही. त्याची सुरुवात पूजा जाधव, देवयानी पारधी या धाडसी स्त्रियांनी केली आहे. ही धाडसाची वाट प्रशस्त व्हायला हवी आणि दीपाली चव्हाणच्या वाटेवर आपल्याला जायचं नाही, याची खूणगाठ बांधण्याचं धैर्य मुलींना शिक्षणाने मिळायला हवं, तरच खऱ्या अर्थाने ‘मुलगी शिकली, प्रगती झाली,’ असं म्हणता येईल.

(लेखिका कवयित्री असून, स्त्रीमुक्ती संघटनेत कार्यरत आहेत.)