पाकमध्ये भारतीयमच्छिमाराचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स
indian fishermans heartbreaking death in pakistan
मासेमारी करताना बोट चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने पाकिस्तानने अटक केलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात गुरुवारी मृत्यू झाला. हा मच्छिमार गुजरातचा असून, त्याची शिक्षा २०२२ मध्ये पूर्ण झाली होती. मात्र, त्याला बेकायदेशीररित्या तुरुंगात ठेवण्यात आले होते.

समुद्रात मासेमारी करताना हा मच्छिमार चुकून पाकिस्तानी हद्दीत गेला होता. मात्र, शिक्षा कालावधी पूर्ण होऊनही तो तुरुंगात होता. त्याच्या मृत्यूमुळे यंदा पाकिस्तानात दोन भारतीय मच्छिमारांचा मृत्यू झाला.