Investigation Into Mpsc Paper Leak Case In Nandurbar
नंदुरबारमध्ये झाडाझडती
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने चौकशीचा फास अधिक आवळला आहे. या पेपरफुटीमधील आरोपी प्रवीण पाटील याला सोबत घेऊन पोलिसांनी नंदुरबार येथील त्याच्या कौटिल्य ॲकॅडमी आणि निवासस्थानाची तपासणी केली.
प्रवीण हा स्पर्धा परीक्षा क्लास चालवत असल्याने त्याने आणखी उमेदवारांना प्रश्नसंच पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यातच ऋतुजा पाटील आणि मयूर ठाकरे यांच्या बाबतीतही अधिक चौकशी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाची चाळणी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात आली. मात्र, परीक्षा होण्यापूर्वी काही दिवस आधी प्रश्न फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान (पान ९वर)