मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील जरांगे आज, शनिवारपासून (२९ ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या ५८ लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची पडताळणी तातडीने करावी, महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, सातारा, कोल्हापूर, औंध, बॉम्बे गॅझेटचा शासन निर्णय काढण्यात यावा, या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. कोणत्याही नेत्याच्या मागे कुणी फिरू नये,’ असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना केले केले.