Kharghar Bjp Worker Caught With Photocopies Of Voter Sir Applications
भाजप कार्यकर्त्याकडे एसआयआर अर्ज
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेंतर्गत जमा करण्यात आलेल्या मतदारांच्या मूळ अर्जांच्या छायांकित प्रती एका दुकानात भाजप कार्यकर्त्याकडून काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजप कार्यकर्ता सूरज पाटील याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पाच ‘बीएलओं’चे निलंबन करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर-१९मधील एका दुकानात निवडणूक आयोगाच्या हजारो गोपनीय ‘एसआयआर’ अर्जांच्या छायांकित प्रती काढण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी तिथे भेट दिली. त्यावेळी भाजपचा स्थानिक पदाधिकारी सूरज पाटील हा मतदारांच्या हजारो मूळ अर्जांच्या प्रती काढताना आढळला. यावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन तणाव निर्माण (पान ९वर)