Nepal Faces Another Flood Catastrophe Chaos And Dire Situation
पुन्हा प्रलयाचे सावट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नेपाळ-तिबेट सीमेवरील विध्वंसक जलप्रलयाने हाहाकार माजवला असताना नेपाळ सरकारने दुसऱ्या प्रलयाचा इशारा दिला आहे. हिमकडे कोसळून जलपातळी वाढत असल्याने पुन्हा जलप्रलयाचा धोका वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, नेपाळमधील ५७९ आणि तिबेटमधील ५ मृतांसह प्रलयबळींची संख्या शुक्रवारी ५८४वर पोहोचली असून, नेपाळमध्ये १९२४ जण अद्याप बेपत्ता आहेत.
हिमनद्यांचे कडे कोसळून मध्य नेपाळच्या रसुवा आणि अन्य भागांसह तिबेटमध्ये बुधवारी आलेल्या जलप्रलयामुळे झालेल्या विध्वंसानंतर शुक्रवारी बचावकार्याला आणखी गती मिळाली. अनेक शहरे, गावे, रस्ते, पूल, जलविद्युत प्रकल्पांना जलप्रलयाचा तडाखा बसला आहे. या प्रलयामुळे नेपाळमध्ये सुमारे दोन हजार जण, तर तिबेटमध्ये ५५८ जण बेपत्ता आहेत. जलप्रलयाने घडवलेल्या विध्वंसासह प्रतिकूल परिस्थितीशी बचावपथकांची झुंज सुरू असताना नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती धोका व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए) पुन्हा महापुराचा इशारा दिला.‘बुधवारी ज्या ठिकाणी अचानक पूर आला होता, त्याच ठिकाणी चिखलमिश्रित पाण्याची पातळी वाढली आहे आणि त्या परिसरात आणखी पूर येण्याचा धोका आहे,’ असे एनडीआरआरएमएने म्हटले.
कोचेन खोला आणि पुरेपू या नद्यांच्या संगमावर नेपाळमध्ये मोठे तलाव तयार झाले असल्याचे सांगत चीनने गुरुवारी सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा प्रलयाची भी आहे.