Parking Fees In Mumbai To Increase By Ten Percent Parking Will Become Expensive
पार्किंग महागणार
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुंबई महापालिकेने वाहनचालकांसाठी शुल्क आकारून सार्वजनिक वाहनतळ आणि ‘ऑन स्ट्रीट’ वाहनतळ उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत न वाढलेले वाहनतळ शुल्क आता महागणार आहे. महापालिकेने येत्या दोन वर्षांसाठी दहा टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आठवडाभरात महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांची मंजुरी मिळताच स्थायी समिती आणि महापालिका सभागृहाकडून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुंबईत पार्किंग महागणार आहे.
सध्या मुंबईत वाहनांची एकूण संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे चालकांना वाहन उभे करण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे महापालिकेनेही पार्किंगवर लक्ष देताना बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळांबरोबरच रस्त्यांवरील पार्किंगच्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत महापालिकेचे सध्या ३७ सार्वजनिक वाहनतळ असून, ६७ ‘ऑन स्ट्रीट’ वाहनतळ आहेत. जानेवारी २०१५ मध्ये सर्वसमावेशक ‘पे अँण्ड पार्क’ धोरण तयार करताना त्यावेळी वाहनतळ शुल्कात भरमसाट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नागरिक आणि राजकीय पक्षांच्या विरोधामुळे राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती दोन वर्षांनी उठवण्यात आली. त्यानंतर २०२२पासून महापालिकेत प्रशासकीय काळ असल्याने तीन वर्षांत वाहनतळ शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर अखेर मुंबई (पान ९वर)