Praggnanandha Celebrates Historic Victory At Grand Chess Tour
प्रज्ञानंदचे ‘ग्रँड’ विजेतेपद
Contributed by: म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
रमेशबाबू प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूर मालिकेतील अंतिम टप्प्याच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकणारा प्रज्ञानंद पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
सेंट लुईस (अमेरिका) येथे झालेल्या या स्पर्धेतील गतविजेता फॅबिआनो करुआनाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत प्राग सहा गुणांनी मागे होता. मात्र, त्याने हार मानली नाही. त्याने अखेरच्या दिवशी कामगिरी उंचावत विजेतेपदास गवसणी घातली.रॅपिडचे (जलद) दोन आणि ब्लिट्झचे (अतिजलद) चार डाव शिल्लक असताना प्राग ३-९ असा पिछाडीवर होता; मात्र त्याने रॅपिडचे दोन्ही डाव जिंकून ११-९ अशी आघाडी घेतली. ब्लिट्झमधील आठ गुणांच्या डावांनंतरही आपली आघाडी कायम राहील, याची काळजी त्याने घेतली. त्याने विजेतेपदाची लढत १५-१३ अशी जिंकली. त्याने विजेतेपदासह दोन लाख डॉलरचे बक्षीस जिंकले.