मुलुंड उड्डाणपुलासाठी प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स
मुलुंड उड्डाणपुलासाठी प्रतिसाद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुलुंड पूर्वेकडून प्रतापराव गुजर मार्ग, नीलमनगरपासून पूर्व दृतगती महामार्गापर्यंत जाताना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. ही कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महापालिका पूल विभागाकडून ०.७८ किलोमीटरचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. १०८ कोटी २३ लाख रुपयांच्या या कामासाठी जारी केलेल्या निविदेला १२ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

सुमारे ७८० मीटर लांबीचा हा पूल प्रतापराव गुजर मार्ग, नीलम नगरला जाऊन पलीकडे पूर्व दृतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. मुलुंड पूर्वेकडून बाहेर पडणारा हा पूल महामार्गावरील घाटकोपर ते ठाणे विस्तारित फ्री वेवरील उन्नत मार्गाला मुलुंड येथेच जोडला जाईल. त्यामुळे वाहनचालक मुलुंड पूर्वेकडून नवीन पुलाचा वापर करून उन्नत मार्गांवर पोहोचून मुंबईच्या दिशेने रवाना होतील व वाहतूक कोंडीतून सुटका होतानाच त्यांचा प्रवासही सुसाट होईल.