35 Students Poisoned In Mangala Express Schoolgirl Dies
मंगला एक्स्प्रेसमध्ये ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जळगाव : हजरत निजामुद्दीन- एरणाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून केरळकडे जाणाऱ्या ८३ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३५ विद्यार्थ्यांना शुक्रवारी रात्री विषबाधेसदृश त्रास झाला. इटारसी स्थानकानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या व अस्वस्थता जाणवू लागली. माहिती मिळताच भुसावळ रेल्वे विभागाने वैद्यकीय यंत्रणा सतर्क केली. गाडी खंडवा स्थानकावर पोहोचताच वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करून प्राथमिक उपचार केले आणि औषधे दिली. खंडवा ते भुसावळ दरम्यानही गाडीत उपचार सुरू ठेवण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास मंगला एक्स्प्रेस भुसावळला पोहोचल्यावर डॉक्टर, परिचारिका, रेल्वे अधिकारी आणि रुग्णवाहिका सज्ज होत्या. तपासणीसाठी गाडी सुमारे ४५ मिनिटे थांबवण्यात आली. उपचारानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केलेे.
धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यूमालेगाव : कुसुंबा-मालेगाव महामार्गावर लेंडाणे गावाजवळ शनिवारी सकाळी भरधाव कारच्या धडकेत आरोही बालाजी चव्हाण (१२) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. कुसुंब्याकडून मालेगावकडे येणाऱ्या एमएच ०६ बी ००५५ क्रमांकाच्या कारने तिला धडक दिली. गंभीर जखमी आरोहीला त्याच कारमधून खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको करीत रोष व्यक्त केला.