Robbery Encircling Car On Samruddhi Highway Shocking Visuals
‘समृद्धी’वर कारला घेरून लूट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वैजापूर : समृद्धी महामार्गावर दिवसाढवळ्या फॉर्च्यूनर कारला तीन कारच्या मदतीने घेरून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी दुपारी वैजापूर हद्दीतील लासूर टोलनाका ओलांडल्यानंतर हा प्रकार घडला. नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या फॉर्च्यूनर चालकाला काही जणांनी मदत मागण्याच्या बहाण्याने थांबवले. गाडी थांबताच चालकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. त्याचवेळी पुढे, मागे आणि उजव्या बाजूला कार उभ्या करून फॉर्च्यूनरचा मार्ग अडवण्यात आला होता. चालकाने प्रसंगावधान राखत आपण स्थानिक असल्याचे सांगितले. समोरील कार पुढे होताच त्याने गाडी बाहेर काढून सिन्नर फाटा गाठला. हा प्रकार डॅशकॅममध्ये कैद झाला आहे.