‘नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक व धार्मिक यात्रेसाठी गेलेले भाविक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षित आपापल्या घरी परतावेत यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करा’, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा येथून ४१जण शनिवारी परतले असून १०६ जण नागपूरला उद्या पहाटे ४.३० वाजता पोहोचतील. जवळपास १४३ नागरिक राज्यात यशस्वी व सुरक्षितपणे परतण्याच्या मार्गावर आहेत.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसृत करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सहाय्यता व मदतकार्य समन्वय साधला जात आहे. महाराष्ट्रातील ४५ पर्यटक भारतीय हद्दीत राज्यातील ४५ जणांच्या पर्यटकांच्या चमूने शनिवारी भारतीय हद्दीत प्रवेश केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई व अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळ येथे गेले होते. महापुराच्या घटनेच्या कालावधीत हे नागरिक चितवन येथे होते. आज काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने नेपाळमधील लुंबिनीमार्गे त्यांना आणण्यात येत असून आज अयोध्या येथे पोहोचल्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार पुढील नियोजन केले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन सूचनानुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८ नागरिकांशी संपर्क झाला आहे. १४९ भारतीय पर्यटक चीनमधून नेपाळमध्ये चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितपणे प्रवेश केलेल्या १४९ भारतीय पर्यटक नागरिकांची २८ ऑगस्टपर्यंतची यादी परराष्ट्र मंत्रालयाने राज्यांना पाठवली आहे. या नागरिकांना आपापल्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. यातील महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नावांची खात्री करून ती एकत्रित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हे पर्यटक लवकरच भारतात परतणार आहेत. यामध्ये मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्यांतील कोणत्याही नागरिकाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आत्तापर्यंत सूचित करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर बसेस व प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येऊन या पर्यटकांना भारतात आणले जात आहे.बोरिवली आणि अंधेरी येथील आठ पर्यटक बोरिवली आणि अंधेरी येथील आठ पर्यटकांची माहिती देण्यात आली असून. आपत्तीमुळे ते नेपाळमध्ये अडकले आहेत. यापैकी अंधेरी येथील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांचा अथवा ग्रुपमधील इतराचा मोबाइलद्वारे संपर्क होत नसल्याने सद्यस्थितीत अडचणी येत आहेत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील या पर्यटकांच्या नातेवाइकांच्या संपर्कात प्रशासन आहे.