आठ वर्षांत विकल्या ४० पदव्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
exposing the racket selling fake degrees in eight years
चंद्रपूर : बोगस पदवी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता त्यात नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत या रॅकेटने मागील आठ वर्षांत सुमारे ४० पदव्या विकल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार परिमल गौरकार याला शुक्रवारी नागपुरातून अटक करण्यात आली. त्याला मदत करणारा अक्षय खोब्रागडे यालाही गजाआड केले.