‘एकाही विद्यार्थ्याचा मृत्यू नको’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
high courts stance on tribal students hunger strike
मुंबई : ‘ उपोषण आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आवश्यक ती सर्व काळजी घ्या. त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळतील आणि डॉक्टर उपलब्ध असतील, याची खबरदारी घ्या. एकाही विद्यार्थ्याचा मृत्यू होता कामा नये,’ असे मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकारला बजावले.

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील विविध भागांत आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले. त्यामुळे याविषयी याचिका केली होती.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी अमरावती येथील अनेक आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पायी लाँग मार्च काढून यवतमाळकडे प्रयाण केले होते. शुक्रवारी त्यांचा मुक्काम बाभूळगाव येथे होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मंत्री डॉ. उईके यांनी पोलिस संरक्षणात मध्यरात्री बाभूळगाव गाठले आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. मागण्यांबाबत आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी घेराव आंदोलन मागे घेतले.