Is The Cost Of Csmt Redevelopment Continuously Increasing
पुनर्विकासाचा खर्च वाढला?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सीएसएमटीला आधुनिक रूप देण्यासाठी त्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. आरएलडीएकडून हे काम सुरू आहे. नव्या प्रवासी सुविधा, उन्नत डेक, कनेक्टिव्हिटी सुधारणा आणि वारसा वास्तूचे संवर्धन अशी विविध कामे या प्रकल्पांतर्गत केली जात आहेत. सीएसएमटीसाठी २४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे खर्चात वाढ झालेली आहे. खर्चाच्या वाढीबाबत अधिकृतपणे आरएलडीएकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.