New Flyover In Mulund Mumbai A Solution To Traffic Congestion
कोंडी फोडण्यासाठी पूलउभारणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुलुंड पूर्वेला उभारण्यात येणारा नवीन उड्डाणपूल फक्त दोन मार्गीकेचा आणि मुलुंडपासून फक्त इस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या दिशेने जाणारा असेल. प्रतापराव गुजरमार्ग, नीलमनगर आणि नवघर येथे सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूककोंडी होते. नवघर येथे तर वाहनांना इस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग असल्याने मुंबईच्या दिशेने जाताना वाहनचालकांना नाकीनऊ येतात. त्यावर तोडगा म्हणून या पुलाची उभारणी केली जात आहे. यासाठीच्या निविदेला १२ कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये एसएमबी कंपनी, एबी इन्फ्रा, सी मंगलम, ज्ञान आर कंपनी यासह अन्य कंपन्यांचा समावेश आहे.