आत्महत्येच्या वाशीत दोन घटना

महाराष्ट्र टाइम्स
shocking case of two suicides in vashi
वाशी शहरात शुक्रवारी रात्री दोन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत.

पहिली घटना २८ ऑगस्टला रात्री वाशीतील जुहूगावात घडली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (नगरदेवळा) येथील मूळ रहिवासी असलेला मनोज कैलास सोनवणे (३२) हा जुहूगावात नातेवाईकांकडे आला होता. दारूच्या नशेत असताना मनोज अचानक इमारतीच्या गच्चीवर गेला. काही जोरदार आवाज झाल्याने गॅलरीतून खाली पाहिले असता, मनोज खाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे नातेवाईकांना दिसले. त्याला तातडीने महापालिका रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत, वाशी सेक्टर-१५ येथे राहणारा अजित जयराम सारन (२३) याने रात्री घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या मित्राने त्याला तात्काळ वाशीतील महापालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नाही.