बस अपघातात१९ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स

A bus plunged into the Trishul River in Nepal, resulting in 19 fatalities and 25 injuries. Among the deceased was a British citizen. In Jharkhand, two individuals were apprehended for the alleged torture of a young man. Police are investigating the cause of the Nepal accident and searching for six absconding suspects in the Jharkhand case.

19 killed in nepal bus accident including british national two arrested in jharkhand youth harassment case

काठमांडू : नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ब्रिटनमधील एका नागरिकाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त २५ जण जखमी झाले. पोखरा येथून काठमांडूच्या दिशेने जाणारी बस बेनिघाट येथे त्रिशुल नदीत कोसळली. मृतांमधील नऊ जणांची ओळख पटविण्यात यश आले आहे. जखमींमध्ये न्यूझीलंडच्या महिलेचा समावेश आहे. अपघाताच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.

दोघांना अटक

मेदिनीनगर : झारखंडमधील पलामू जिल्ह्यात तरुणाचा छळ केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. पारसनाथ मेहता (३६) आणि बिरेंद्र महतो (६०) अशी त्यांची नावे आहेत. पदडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तेलियाही गावात शनिवारी संबंधित घटना घडली होती. यात पवन राम (२२) या तरुणाला जमावाने मारहाण केली होती. घटनेतील संशयित सहा जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.