रास्ता पेठेत घरफोडी

महाराष्ट्र टाइम्स

A daring daylight burglary has shaken Rasta Peth, Pune. Thieves targeted a flat, breaking the lock and making off with cash and gold jewelry valued at Rs 14.30 lakh. The incident occurred while the resident was out. Police have registered a case and are investigating. This follows a recent rise in daytime burglaries across the city.

daylight house break in in punes rasta peth cash and gold ornaments worth 1430 lakh stolen from jain heights society

पुणे : रास्ता पेठ परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा १४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कुटुंबीयांसह रास्ता पेठेतील जैन हाइट्स सोसायटीत राहतात. त्या शनिवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी ४.३०च्या सुमारास सदनिका बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील १७ हजार रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तक्रारदार महिला रात्री आठच्या सुमारास घरी परतल्या. घरफोडीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भागवत शेंडगे करीत आहेत.

शहरात काही दिवसांत भर दिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी घराबाहेर जाताना अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.